लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात दुर्दैवी घटना : नालीत पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; पुलाच्या कठड्यांबाबत नागरिकांचा संताप

वरोऱ्यात दुर्दैवी घटना : नालीत पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू;  पुलाच्या कठड्यांबाबत नागरिकांचा संताप

वरोरा | चेतन लूतडे 

वरोरा शहरातील टिळकवाड परिसरात नालीत पडून एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृत व्यक्तीचे नाव महेश गोपीचंद मेश्राम (वय ५३, रा. सरदार पटेल वॉर्ड, वरोरा) असे असून ते एमएच-३१-डीजे-९४२५ क्रमांकाच्या डिओ (Moped Dio) दुचाकीवरून जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी चौक येथून सरदार पटेल वॉर्ड व फैल वॉर्डकडे जाणाऱ्या मार्गावरील छोट्या पुलाजवळ ही घटना घडली. संबंधित पुलावर संरक्षण कठडे नाहीत व बऱ्याच वर्षापासून या नालीचे बांधकाम झालेले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. पुला लगत असलेल्या नालीजवळून जात असताना महेश मेश्राम यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते नालीत पडले. नाली मध्ये वरती फक्त त्यांचे शर्ट दिसत होते त्यामुळे आत मध्ये कोणी आहे हे फार वेळाने कळले.
घटनेची माहिती मिळेपर्यंत ते नालीतील पाण्यात बुडाले असून त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.  शहरातील गजबजलेल्या भागात अशा प्रकारे नालीत बुडून नागरिकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती .माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविण्यात आला.
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित पुलावरील संरक्षण कठडे तातडीने मजबूत करावेत, तसेच नालीवर सुरक्षित संरक्षक व्यवस्था उभारून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी नगरपालिकेने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Comments