तेलंगणातील RIMS रुग्णालयातील व्हेंटिलेटर चोरीचा चंद्रपूर पोलिसांकडून पर्दाफाश!

तेलंगणातील RIMS रुग्णालयातील व्हेंटिलेटर चोरीचा चंद्रपूर पोलिसांकडून पर्दाफाश! ₹२० लाखांच्या चार व्हेंटिलेटर चोरीप्रकरणी मुख्य संशयित चंद्रपुरातून जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपी तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन चंद्रपूर, दि. ४ नोव्हेंबर : तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था (RIMS) या शासकीय रुग्णालयातून चोरीस गेलेल्या चार महागड्या व्हेंटिलेटर चोरीप्रकरणाचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी त्याला तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आदिलाबाद येथील RIMS शासकीय रुग्णालयातील RICU, SARI तसेच TB वॉर्डमधून चार महागडे व्हेंटिलेटर अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते. या चोरीच्या साहित्याची एकूण अंदाजित किंमत २० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद आहे. या घटनेप्रकरणी आदिलाबाद-२ टाऊन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक...

चिवड्यात चक्क पाल! वरोऱ्यात विषबाधेचा धक्कादायक प्रकार; सहा जण रुग्णालयात

चिवड्यात चक्क पाल! वरोऱ्यात विषबाधेचा धक्कादायक प्रकार; सहा जण रुग्णालयात

वरोरा, दि. २८ सप्टेंबर : वरोरा शहरातील बस स्टॉप रोडवरील आयटीआयलगत असलेल्या ‘मनोज चिवडा सेंटर’ येथून खरेदी केलेल्या चिवड्यात पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा चिवडा खाल्ल्यानंतर काही नागरिकांना त्रास होऊन विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाधित नागरिकांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, चिवडा खाल्ल्यानंतर संबंधित नागरिकांना उलट्या, मळमळ तसेच प्रकृती अस्वस्थ होण्याचा त्रास जाणवला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिवड्यात पाल आढळल्याने या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची नावे :

  • सुवर्णा प्रवीण कोहळे, वय ४५ वर्षे, रा. माजरी
  • प्रविण शालीकराम कोहळे, वय ५० वर्षे, रा. माजरी
  • पंकज दिगंबर आवारी, वय ४० वर्षे, रा. राळेगाव
  • दिगंबर विठ्ठजी आवारी, रा. राळेगाव
  • अफजल रफीक अहेमतखान, रा. भद्रावती/कोगाव
  • शेख रेहमान, रा. कोरेगाव
  • आयुब सागीर खान, रा. भद्रावती

दिलेल्या माहितीनुसार सहा जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले असले तरी, रुग्णांच्या यादीत सात नावे आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांची नेमकी संख्या संबंधित रुग्णालय अथवा प्रशासनाकडून निश्चित होणे आवश्यक आहे.

दरम्यान, अन्नपदार्थात पाल आढळल्याच्या या प्रकाराची अन्न व औषध प्रशासन विभागाने गंभीर दखल घेऊन संबंधित खाद्यपदार्थाची तपासणी व नमुने घेऊन नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनेबाबत प्रशासनाच्या तपासणीनंतरच विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


अन्न आणि औषध प्रशासन विभाग जागा होईल काय?

औषध व अन्न प्रशासन विभाग अशा दुकानाकडे दुर्लक्षित करीत असल्याने वरोरा शहरात अनेकदा अशा घटना होत आहे. एकीकडे याच विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थ विरोधात तीव्र कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र वरोरा सारख्या शहरांमध्ये अजूनही तुकाराम मुंढे यांचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. या घटनेबाबत या विभागातील अधिकाऱ्यांना आता तरी जाग येईल का हा प्रश्न नागरिकतर्फे करण्यात येत आहे.

...........

Comments