वरोरा–रत्नमाला रस्त्यावर नव्या काँक्रीट रस्त्याला तडे; मोठमोठे खड्डे पडल्याने संताप.कामगार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुयोग भोयर यांचा सवाल?

वरोरा–रत्नमाला रस्त्यावर नव्या काँक्रीट रस्त्याला तडे; मोठमोठे खड्डे पडल्याने संताप. कामगार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सुयोग भोयर यांचा सवाल? वरोरा : वरोरा–रत्नमाला परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याची काही दिवसांतच दुरवस्था झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी तडे जाऊन मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्याने बांधलेल्या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाबाबत तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्ता तयार केल्यानंतर काही कालावधीतच तो खराब होत असल्याने संबंधित यंत्रणेने याची तातडीने पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, “रस्ता बनवला की अपघातांना निमंत्रण दिलं?” असा सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामगार सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुयोग पुरुषोत्तम भोयर यांनी या प्रकाराविरोधात आवाज उठवला आहे. नागरिकांच्या जीविताशी खेळ करणारा प्रकार सहन केला जाणार नाही. दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने उपाययो...

वरोऱ्यात ऑटो पलटून भीषण अपघात; मोहिनी शंकर देवाळकर यांचा मृत्यू, मुलगा जखमी

वरोऱ्यात ऑटो पलटून भीषण अपघात; मोहिनी शंकर देवाळकर यांचा मृत्यू, मुलगा जखमी

वरोरा प्रतिनिधी :
वरोरा तालुक्यातील आनंदवन चौकाजवळ भरधाव वेगाने धावणारा ऑटो रस्त्यावरील खड्ड्यात गेल्याने पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा जखमी झाला. या प्रकरणी ऑटो चालकाविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणपत धोंडुजी देवाळकर (वय 68, व्यवसाय – मजुरी, रा. तेली फाईल वार्ड क्र. 25, सरकारी दवाखान्यामागे, वणी, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची सून मोहिनी शंकर देवाळकर (वय 42), नात तनु शंकर देवाळकर (वय 18), नातू गितेश शंकर देवाळकर (वय 10) तसेच भावेश मेश्राम (वय 12) हे 1 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 8.30 वाजता ऑटो क्रमांक MH-29 BD-1342 मधून गिरड येथून वणीकडे जात होते.

वरोरा येथील आनंदवन चौकाजवळील मुख्य रस्त्यावर ऑटो चालक संतोष अन्नाजी राऊत (वय 49) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालविल्याने ऑटो रस्त्यावरील खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात मोहिनी देवाळकर गंभीर जखमी झाल्या, तर गितेश देवाळकर यांच्या हाताला दुखापत झाली.

दरम्यान, रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांना त्यांची नात अणु देवाळकर हिने दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर फिर्यादी आपल्या नातजावई अमोल पांडुरंग आवारी यांच्यासह उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पोहोचले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून मोहिनी शंकर देवाळकर यांना मृत घोषित केले, तर गितेश देवाळकर यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले.

फिर्यादीच्या तक्रारीवरून ऑटो चालक संतोष अन्नाजी राऊत याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.



Comments