लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चंदनखेडा तंमुसच्या पुढाकाराने आंतरजातीय प्रेमीयुगुल विवाहबद्ध

*चंदनखेडा  तंमुसच्या पुढाकाराने  आंतरजातीय प्रेमीयुगुल विवाहबद्ध*

*प्रेमात गुरफटलेला प्रेमी युगुलांचा पार पडला आदर्श गावात प्रेम विवाह*

*दोघांनीही सुखाने संसार करण्याची घेतली शपथ.*
 
अतुल कोल्हे भद्रावती
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीने चंदनखेडा  येथील बाळू बळीराम मकरे (29) व कुमारी योगिता विकास ननवरे (19) यांनी चंदनखेडा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीकडे अर्ज सादर करुन लग्न लावून देण्याची विनंती केली होती.
दिनांक  13 जुलै  2024ला. महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर शालिक हनवते  यांनी दोघांचीही कागदपत्रे तपासून व या विवाह ला आवर्जुन मुलांचे आई - भाऊ व इतर नातेवाईकांना तंटामुक्त समिती मार्फत बोलविण्यात आले होते व ते स्वतः हजर राहून वरवधुला आशिर्वाद देऊन त्यांनांच आनंद दृघुनी करण्यात तंटामुक्त समितीला यश आलं व समोरिल जिवन सुरळीत चालत रहावं अशा शुभेच्छा मुलाच्या आई व बहीण -जावई यांच्या कडुन देण्यात आल्या. व   त्यांचा विवाह 15 जुलै 2024 सोमवार ला. सकाळी 11:45 ला.विवाह हनुमान मंदिर सीताबर्डी  देवस्थान चंदनखेडा येथे  गावातील पंचासमक्ष लावून दिला.
यावेळी मुलाची आई छबू बळीराम मकरे , जावई प्रमोद गोहणे ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिर पठाण, सरपंच नयन जांभुळे,  सिंगलदीप पेंदाम, बशीर शेख, सुरेश गुंटिकवार, लोकेश कोकुडे, बालाजी महागमकार, नंदकिशोर जांभुळे, सुधाकर दोडके,प्रविण भरडे, बंडूजी गोहण, बाळकृष्ण गोहणे संदीप मानकर, सागर मानकर, निसार का पठाण,अतुल घरात, अरुण हनवते, राकेश ढोक, अक्षय मोहाळे, अंकुश चट्टे  तंटामुक्त समिती सदस्या छाया घुगरे, सुशिलाबाई हनवते, सोनाबाई खडसंग, अमृता कोकुळे,नसरिन पठाण,छाया मांदाळे, भाग्यश्री सोनुले,वनिता नन्नावरे,दिवाकर गोहणे,आशिष हनवते व समस्त आदि गावातील उपस्थित होते.आई वडिल व तंटामुक्त समिती मार्फत यावेळी दोघांनीही ‌सुखदुखात  एकमेकांना साथ देण्याची  शपथ घेतली.

Comments