वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मिलींद रायपूरे तर सचिवपदी ॲड. विजय मत्ते*

*अधिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड. मिलींद रायपूरे तर सचिवपदी ॲड. विजय मत्ते*

अतुल कोल्हे भद्रावती : 
             तालुका अधिवक्ता सघाच्या दिनांक २२ मार्चला निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीत  ॲड. मिलिंद रायपूरे हे ४९ पैकी ३५ मते घेवून तालुका अधिवक्ता संघाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर  ॲड. विजय मत्ते सचिव म्हणून निवडून आले.           सदर निवडणूक प्रक्रियेत ॲड एम. आर. शेख यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम केले, तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. किशोर धोटे, व ॲड. ओमप्रकाश चौधरी यांनी काम पाहिले. त्यांच्या या विजयाचे ॲड.उदय पलिकुंडवार, ॲड. भूपेंद्र रायपुरे, ॲड. प्राशिष ताठे, ॲड.कुणाल पथाडे, ॲड.सुनील नामोजवार, ॲड.अर्चना आगलावे, ॲड.राजू सपकाळ, ॲड. भडगरे, ॲड. कविश्वर चालखुरे व अन्य सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

Comments