वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

हंसराजभैय्या अहिर यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा उत्साहात; आपुलकीच्या नात्यांचा सुंदर संगम

हंसराजभैय्या अहिर यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा उत्साहात; आपुलकीच्या नात्यांचा सुंदर संगम

चंद्रपूर | दि. ४ सप्टेंबर २०२६ / चेतन लूतडे 

देशाचे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मार्गदर्शक आदरणीय श्री. हंसराजभैय्या अहिर यांच्या निवासस्थानी आज रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, मंगलमय आणि आत्मीय वातावरणात साजरा करण्यात आला. माता-भगिनींच्या प्रेम, स्नेह आणि आशीर्वादाने हा सोहळा विशेष भावनिक व संस्मरणीय ठरला.


या पावन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लाडक्या माता-भगिनींकडून प्रेमाने राखी बांधून घेत त्यांच्या शुभाशीर्वादाचा स्वीकार केला आणि सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधन हा केवळ धाग्याचा सण नसून प्रेम, विश्वास, संरक्षण आणि अतूट नात्यांचा पवित्र उत्सव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


याप्रसंगी शेतकऱ्यांचा खरा सखा, कष्टाचा सोबती आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या ‘बैलजोडीच्या देखण्या प्रतिकृती’ची भेट आदरणीय हंसराजभैय्या अहिर यांना सस्नेह देण्यात आली. त्यांनीही या प्रेमळ भेटीचा स्वीकार करत उपस्थितांचे आभार मानले व शुभाशीर्वाद दिले.

तसेच, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा एक वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल श्री. राजू डोंगे यांचे आदरणीय हंसराजभैय्या अहिर यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले. त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छाही देण्यात आल्या.

या सोहळ्यास आमदार श्री. किशोरजी जोरगेवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, चंद्रपूरच्या महापौर सौ. संगीताताई खांडेकर, श्री. अशोकजी जीवतोडे, श्री. रघुवीरजी अहिर, श्री. तुषारजी सोम, श्री. राजू डोंगे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती), श्री. संजय उमरे, श्री. प्रवीणभाऊ सातपुते, श्री. रमेशजी मेश्राम यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राखीच्या एका पवित्र धाग्यात प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे अनमोल नाते गुंफलेले असते. हाच प्रेमाचा धागा समाजातील माणुसकी, आपुलकी आणि बंधुभाव अधिक दृढ करत राहो, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.

.............

Comments