लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भद्रावतीत शिवसेनेच्या वतीने भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व रुग्णवाहिका अनावरण सोहळा; सेलिब्रिटी कलाकारांची असणार खास उपस्थिती.

भद्रावतीत शिवसेनेच्या वतीने भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव व रुग्णवाहिका अनावरण सोहळा;

सेलिब्रिटी कलाकारांची असणार खास उपस्थिती.

भद्रावती (विशेष प्रतिनिधी):


शिवसेना वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही श्रीकृष्ण जन्माष्टमी (दहीहंडी) उत्सव व रुग्णवाहिका अनावरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय उत्सव शनिवार, ०५ सप्टेंबर आणि रविवार, ०६ सप्टेंबर २०२६ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, हनुमान नगर, भद्रावती येथे पार पडणार आहे.

दोन दिवसीय कार्यक्रमांची रूपरेषा:

  • शनिवार, ०५ सप्टेंबर २०२६:
    • वेळ: सकाळी १०:०० ते रात्री १०:००
    • रांगोळी स्पर्धा: सकाळी १०:०० ते दुपारी १:००
    • वेशभूषा व संवाद स्पर्धा: सायंकाळी ६:०० ते रात्री १०:००
    • विशेष आकर्षण: 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्री गायत्री दातार आणि 'धर्मवीर' चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारे अभिनेता क्षितीज दाते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
  • रविवार, ०६ सप्टेंबर २०२६:
    • वेळ: सायंकाळी ५:०० ते रात्री १०:००
    • प्रमुख उपक्रम: भव्य दहीहंडी उत्सव, रुग्णवाहिका अनावरण सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
    • प्रमुख उपस्थिती: राज्यमंत्री तथा पूर्व विदर्भ संपर्क मंत्री ॲड. आशिषजी जयस्वाल यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

भव्य आयोजनात शिवसैनिकांचा पुढाकार:

या कार्यक्रमाचे आयोजन एकनाथ शिंदे गटाचे , शिवसेना लोकसभा संघटक (चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्र) मुकेश मनोज जिवतोडे, भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रफुल रा. चटकी, उपाध्यक्ष सुधीरभाऊ सातपुते, सभापती रेखाताई खुटमाटे, शोभाताई पारखी, राहुल सोनटक्के यांच्यासह विविध नगरसेवक, समस्त पदाधिकारी व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

​या सर्व विविध गुणदर्शन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि दहीहंडी उत्सवाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

..........

Comments