लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मांगली येथे झेंडी-मुंडी जुगारावर पोलिसांची कारवाई; ३,६८० रुपये जप्त


मांगली येथे झेंडी-मुंडी जुगारावर पोलिसांची कारवाई; ३,६८० रुपये जप्त

भद्रावती, दि. १० सप्टेंबर २०२६ : मांगली परिसरात झेंडी-मुंडीच्या आधारे पैशांची हार-जीत लावून जुगार खेळविणाऱ्या एका व्यक्तीवर भद्रावती पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत आरोपीकडून ३,६८० रुपये रोख, झेंडी-मुंडीचा चार्ट, चार कांड्या व एक स्टीलची वाटी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी पोलीस पथक मांगली परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिराकडून झेंडी-मुंडीचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पंचांसह घटनास्थळी कारवाई करण्यात आली. पोलिसांना पाहून काही जण तेथून निघून गेले, तर एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याने आपले नाव घनश्याम विठोबाजी ढेंगडे (वय ४५, व्यवसाय शेती, रा. मांगली, भद्रावती) असे सांगितले. त्याच्याकडून झेंडी-मुंडीची चिन्हे असलेला २×३ चार्ट, चार कांड्या, एक जुनी स्टीलची वाटी आणि ३,६८० रुपये रोख असा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपी घनश्याम विठोबाजी ढेंगडे याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्याद सफौ महेंद्र खुशालराव बेसरकर, ब.नं. ३५, पोलीस स्टेशन भद्रावती यांनी दिली.

Comments