वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

भरधाव टाटा एसची दुचाकीला धडक; एकार्जुनातील युवक गंभीर जखमी.

भरधाव टाटा एसची दुचाकीला धडक; एकार्जुनातील युवक गंभीर जखमी

वरोरा : आलीशान हॉटेलसमोर अपघात; गंभीर जखमीवर चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

वरोरा, दि. 6 सप्टेंबर २०२६ : वरोरा-वणी मार्गावरील आलीशान हॉटेलसमोर भरधाव व निष्काळजीपणे येणाऱ्या टाटा एस वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

याबाबत प्रमोद विठ्ठल थेरे (वय ४७, रा. एकार्जुना, ता. वरोरा) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांचे मेहुणे विनोद बालाजी निमकर (वय ४०, रा. एकार्जुना) हे वर्धा पॉवर प्लांट येथे नोकरीस असून शेती व्यवसायही करतात. त्यांच्या मालकीची हिरो पॅशन मोटारसायकल क्रमांक MH 34 AJ 3983 असून ते स्वतः ती वापरत होते.

दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ७ वाजताच्या दरम्यान, विनोद निमकर हे एकार्जुनाहून वरोरा मार्केटकडे दुचाकीने जात असताना आलीशान हॉटेलसमोर वणीकडून वरोऱ्याकडे येणाऱ्या टाटा एस वाहन क्रमांक MH 39 BE 2846 च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या धडकेत विनोद निमकर हे रस्त्यावर पडले असून त्यांच्या डाव्या हाताला व कमरेला दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना नातेवाईकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातास टाटा एस वाहनचालकाचा भरधाव व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित वाहनचालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार प्रमोद थेरे यांनी वरोरा पोलिसांकडे केली आहे.

पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments