वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर.डॉ. विजय देवतळे यांचे सभापतीपद धोक्यात; संचालक राजू चिकटे, जयंत टेंमुर्डे दावेदार

वरोरा बाजार समितीच्या सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर.

डॉ. विजय देवतळे यांचे सभापतीपद धोक्यात; संचालक राजू चिकटे, जयंत टेंमुर्डे दावेदार

वरोरा, दि. १० सप्टेंबर : वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. विजय रामचंद्र देवतळे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी विशेष सभा घेण्यात आली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्याकडून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज विशेष सभा घेऊन अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. या सभेत १२ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने सत्ताधारी डॉ. विजय देवतळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला.
दरम्यान, बाजार समितीच्या संचालक मंडळातील पाच संचालक डॉ. विजय देवतळे यांच्या बाजूने होते. मात्र, बाराही सदस्य संख्या कायम असल्याने अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सभापतीपदाच्या राजकीय समीकरणांना आता वेगळे वळण मिळाले आहे.
नवीन सभापती कोण होणार, याबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र राजू चिकटे आणि जयंत टेंमुर्डे हे सभापतीपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात असून, आगामी काळात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे बाजार समितीच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सभापतीपदासाठी नवीन निवड प्रक्रिया नियमानुसार होणार असून, त्यानंतर वरोरा बाजार समितीची धुरा कोण सांभाळणार हे स्पष्ट होणार आहे.


Comments