वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन॥ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा ॥

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन.

॥ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा ॥

वरोरा : गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वानिमित्त खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झाले. धानोरकर परिवाराच्या वतीने गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून पूजा-अर्चा करण्यात आली.


यावेळी धानोरकर कुटुंबीय, मित्रपरिवार व आप्तेष्टांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

गणेशोत्सवानिमित्त खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातील सर्व नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि गणेशभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. गणरायाच्या कृपेने शेतकऱ्यांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, शेतकऱ्यांना भरघोस पीक व चांगले उत्पन्न मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

तसेच जनतेच्या जीवनातील दुःख, अडचणी आणि संकटे गणरायाने दूर करावीत आणि सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदावी, अशी मनोकामना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली.

गणरायाच्या आगमनामुळे धानोरकर यांच्या निवासस्थानी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील दिवसांत भक्तिभावाने श्री गणरायाची आराधना करण्यात येणार आहे.

..........

आमदार करण देवतळे यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन. 

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सव निमित्त सर्व जनतेला मंगलमय शुभेच्छा .
.......

Comments