वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोऱ्यात बंद घराचे कुलूप तोडून १.२५ लाखांचा ऐवज लंपाससोन्याचे दागिने व १० हजारांची रोकड चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल.

🔴 वरोऱ्यात बंद घराचे कुलूप तोडून १.२५ लाखांचा ऐवज लंपास
सोन्याचे दागिने व १० हजारांची रोकड चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा | दि. 16 सप्टेंबर २०२६ : अंबादेवी वार्डमागील विधाते ले-आऊट परिसरातील बंद घराचे कुलूप व कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज आलमारी फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

याबाबत सुशांत गोपाल आगलावे (वय ३०, रा. अंबादेवी वार्डमागे, विधाते ले-आऊट, वरोरा) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


फिर्यादीच्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांची बहीण साक्षी हिला रत्नमाला चौकात सोडल्यानंतर ते घरी परतले. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता आई सुनिता यांना मोहबाळा येथील मामाच्या घरी सोडून ते घरी आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून ते महाकाल गणेश मंडळ येथे गेले. त्यानंतर मित्राकडे गेले होते.

दरम्यान, दुपारी सुमारे ४ वाजता त्यांच्या आईने फोन करून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप व कोंडा तुटलेला असून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर सुशांत आगलावे घरी पोहोचले. घराची पाहणी केली असता बेडरूममधील लोखंडी गोदरेज आलमारीचा लॉक तोडलेला व दोन्ही दरवाजे उघडे असल्याचे आढळले. आलमारीतील कपडे व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.

आलमारीमध्ये ठेवलेल्या छोट्या पर्समधील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील बिरी लटकनसहित आणि अंदाजे १ ग्रॅम वजनाचे ओम आकाराचे सोन्याचे लॉकेट, असे एकूण १ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. तसेच आलमारीतील मोठ्या पर्समध्ये ठेवलेली १० हजार रुपयांची रोकडही गायब असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घरातील व्यक्ती बाहेर असताना अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून घरात प्रवेश करून हा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) घरफोडी व चोरीसंबंधी लागू कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून, चोरीच्या मुद्देमालाचा व आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.



Comments