लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*आमदार करण देवतळे यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे उत्साहात आगमन*

*आमदार करण देवतळे यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे उत्साहात आगमन* 

वरोरा : 
आज सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश चतुर्थी आहे. भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. आजच्या दिवशी घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून पूजा-अर्चा केली जाते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांच्या वरोरा येथील  पुष्पांजली निवासस्थानी श्री गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. यावेळी आमदार करण देवतळे यांनी कुटुंबीयांसह श्री गणेशाची विधिवत पूजा-अर्चा करून आरती करण्यात आली.

गणरायाच्या आगमनाने देवतळे यांच्या निवासस्थानी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने श्री गणेशाचे स्वागत केले. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली. यावेळी सर्वांनी श्री गणरायाकडे सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी सर्व देवतळे परिवार उपस्थित होते.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा उत्सव असून, या काळात घराघरांत गणरायाचे स्वागत केले जाते. सामाजिक एकोपा, भक्ती आणि आनंदाचा संदेश देणारा हा उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे.
.........................
     खासदार प्रतिपाताई धानोरकर यांच्या येथील गणपती. 

आजच्या दिवसाचे धार्मिक महत्त्व
गणेश चतुर्थीचा प्रारंभदिवस असल्याने आज गणरायाचे विशेष पूजन केले जाते.
प्राणप्रतिष्ठा, दुर्वा, लाल फुले, मोदक आणि नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.
गणपतीला विघ्नहर्ता मानल्यामुळे अडथळे दूर व्हावेत आणि सर्व कार्य निर्विघ्न पार पडावे, अशी प्रार्थना केली जाते.
घरातील सर्व सदस्यांनी एकत्रित आरती व पूजा केल्याने कुटुंबातील एकोपा आणि भक्तीभाव वाढतो, अशी श्रद्धा आहे.
महाराष्ट्रात आजपासून गणेशोत्सवाचा उत्साह सुरू होतो आणि विविध ठिकाणी धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
यंदा १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थी आणि हरतालिका हे दोन्ही सण एकाच दिवशी आले आहेत.

श्री गणेश चतुर्थी व गणेश उत्सव निमित्त शिंदे परिवारातर्फे  सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
............

Comments