वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*चिमुकल्या तीन वर्षीय आधीराजने साकारली बाप्पाची मूर्ती*

*चिमुकल्या तीन वर्षीय आधीराजने साकारली बाप्पाची मूर्ती*

वरोडा : शाम ठेंगडी
      
          अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या अधिराज आकाश भागडे याने आपल्या छोट्याशा हातांनी शाडूमातीपासून गणपती बाप्पांची मूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा सुंदर संदेश दिला आहे.
       मूळचे वरोडा येथील आकाश भागडे व्यवसायामुळे नागपूर येथे वास्तव्यास आहे. वरोडा येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा उर्फ सुभाष भागडे यांचा आकाश हा मुलगा आहे. आकाश यास अधिराज नामक तीन वर्षीय मुलगा आहे.

अधिराजला चितारओळीत गणपतीच्या मूर्ती कशा तयार केल्या जातात हे दाखवण्यासाठी नेण्यात आले होते. तेथे मोठमोठ्या गणेशमूर्ती तयार होताना पाहून त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले. “गणपती बाप्पा कसे बनतात?” हा प्रश्न त्याच्या मनात आला. त्यानंतर “मलाही गणपती बनवून बघायचा आहे,” असा हट्ट त्याने आई-वडिलांजवळ धरला.

अधिराजने शाडूमाती हातात घेतली आणि ती मळत स्वतःच्या कल्पनेतून बाप्पांना आकार देण्यास सुरुवात केली. बाप्पांची छोटीशी सोंड, मोठमोठे कान आणि इतर बारकावे साकारतांना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. विशेष म्हणजे बाप्पांच्या हातात मोदक ठेवायलाही तो विसरला नाही.

बाप्पांना आकार देताना त्याचे छोटेसे हात शाडूमातीने माखले होते; मात्र त्या छोट्या हातांनी साकारलेला बाप्पा सर्वांसाठी अनमोल आठवण ठरला आहे. अधिराजने ही मूर्ती स्वतः बनवली असून, त्याला त्याच्या वडिलांनी केवळ थोडीफार मदत केली असे त्यांनी सांगितले.
      पर्यावरण पूरक जीवनशैली, नैसर्गिक वस्तूंचा वापर व शाडू माती पासून गणपती बनवण्या सारख्या कलात्मक उपकरणाचा लहान मुलांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, आत्मविश्वास आणि भावनिक विकासावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे या वयात मोबाईल आणि टीव्ही पासून काही काळ दूर ठेवत असा सृजनशील उपक्रमांमध्ये सहभाग करून घेण्याचा भागडे कुटुंबांचा प्रयत्न आहे.
         संस्कृती परंपरा कला आणि पर्यावरणाची जाणीव लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवावी हा या उपक्रमामुळे मुख्य उद्देश आहे .
अधिराजच्या या छोट्याशा प्रयत्नातून त्याचे बाप्पावरील प्रेम, कलात्मतेची आवड आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश एकाच वेळी समाजासमोर आला आहे.

Comments