लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात युवकाला गांजा विक्रीच्या संशयावरून मारहाण; चौघांविरोधात तक्रार.

वरोऱ्यात युवकाला गांजा विक्रीच्या संशयावरून मारहाण; चौघांविरोधात तक्रार.

वरोरा | दि. 6 सप्टेंबर २०२६
वरोरा शहरात गांजा विक्रीचा धंदा करत असल्याच्या संशयावरून एका युवकाला तसेच त्याचे भांडण सोडविण्यास आलेल्या युवकाला हाताबुक्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात तोंडी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आकाश जाधव (वय २४, रा. चिरघर प्लॉट, नेताजी वॉर्ड, वरोरा) यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास नेहरू चौक परिसरात राजा थैम याने आकाश जाधव यांना थांबवून, “तू गांजा विक्रीचा धंदा करत आहेस का?” अशी विचारणा केली. त्यावर आपण कोणत्याही प्रकारचा गांजा विक्रीचा व्यवसाय करीत नसल्याचे जाधव यांनी सांगितले.

त्यानंतर त्याच दिवशी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान, आकाश जाधव हे त्यांचा चुलत भाचा गौरव वाघ याच्यासोबत दुचाकीने आंबेडकर चौकाकडून मयूर बार मार्गे घराकडे जात होते. मयूर बारच्या बाजूला राम रगाताटे यांच्या दुकानाजवळ जाकीर रसूल शेख दिसल्याने आकाश जाधव बोलण्यासाठी थांबले.

यावेळी राजा थैम याने विनाकारण हाताबुक्यांनी व गालावर थापडा मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर तिनं युवकांनी तिथे येऊन त्यांनीही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या बंटी उर्फ प्रणव अरविंद हिरादेवे यालाही मारहाण करून अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकही घटनास्थळापासून दूर गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात संबंधित आरोपींनी मिळून दोघांना मारहाण व शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आकाश जाधव यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत केली आहे. आकाश जाधव यांनी आपल्याला गंभीर दुखापत नसल्याने वैद्यकीय उपचारासाठी जाण्याची इच्छा नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरुन भारतीय न्याय सहिता २०२३ नुसार २९६,११५ (२),३(५) गुन्हा दाखल करण्यात आला असून या  प्रकरणी वरोरा पोलीस ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Comments