वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

बोडखा–पवनगाव सीमेवर वाघाची दहशत; युवकावर हल्ला ,विशाल मून यांनी धाडसाने वाघाचा सामना करत वाचवला जीव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बोडखा–पवनगाव सीमेवर वाघाची दहशत; युवकावर हल्ला

विशाल मून यांनी धाडसाने वाघाचा सामना करत वाचवला जीव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

📍 बोडखा/पवनगाव : चंद्रपूर जिल्ह्यातील बोडखा आणि वर्धा जिल्ह्यातील पवनगाव गावाच्या सीमेवर पट्टेदार वाघाची दहशत वाढली असून, वाघाने एका युवकावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी समोर आली आहे. विशाल मून असे हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या युवकाचे नाव आहे. विशाल यांनी प्रसंगावधान राखत आणि धाडसाने वाघाचा सामना करत स्वतःचा जीव वाचविल्याची माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी बोडखा परिसरातील काही युवकांवरही वाघाने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा पवनगाव येथील युवकावर वाघाने हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागात वाघाचा सातत्याने वावर असल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच जंगलालगतच्या परिसरात जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांनी वनविभागाच्या कार्यवाहीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. बोडखा परिसरातील काही युवक आणि वनविभाग या वाघाच्या शोधात असून या ठिकाणी दोन ते तीन वाघ असण्याची शक्यता वर्तवली आहे. अजून पर्यंत या वाघाचे ठाव ठिकाण लागले नसून वनविभाग त्याला शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. 

वाघाचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी मानवी जीवाची सुरक्षा त्याहून अधिक महत्त्वाची आहे. वारंवार हल्ल्याच्या घटना घडत असताना वनविभाग आणखी किती जीव धोक्यात येण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वनविभागाने या गंभीर घटनेची दखल घेऊन तात्काळ परिसरात गस्त वाढवावी, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या ठोस उपाययोजना करून संबंधित वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बोडखा व पवनगाव परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.


Comments