लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

वरोऱ्यात कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

वरोरा | दि. 10 सप्टेंबर 2026 :  कारने पल्सर मोटारसायकलला समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश बंडू रनदई (वय 28, रा. मित्रांगण बिल्डिंग, आनंदवन, ता. वरोरा) हा फोटोग्राफर असून त्याच्याकडे MH-34-CH-8834 क्रमांकाची पल्सर मोटारसायकल आहे. दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास आकाश हा मोहित चूधरी याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना   मागून येणाऱ्या MH-34-BV-5813 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या किया सेल्टॉस कारने दुचाकीला धडक दिली.

या अपघातात आकाश व मोहित यांच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र तिथे उपचार होऊ शकले नाही. नंतर खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. आकाश रणदई यांच्या  मित्रांनी व शेजारील मित्र परिवाराने  आर्थिक मदत लगेच केल्याने उपचार वेळेत करण्यात आले. आकाश यांची प्रकृती गंभीर असून चंद्रपूर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.

याप्रकरणी आकाशची आई माया बंडू रनदई (वय 47) यांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी भा.न्या.सं. कलम 281,१२५(अ),१२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



Comments