लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात विद्यार्थिनी बेपत्ता; अज्ञात इसमाने फूस लावून पळविल्याचा संशय

वरोऱ्यात विद्यार्थिनी बेपत्ता; अज्ञात इसमाने फूस लावून पळविल्याचा संशय

वरोरा, दि. ३ सप्टेंबर : वरोरा तालुक्यातील एका खेड्यामध्ये येथील १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी घरातून वरोरा येथे फोटो काढण्यासाठी गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मुलीच्या आईने अज्ञात इसमाने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रानगावातील राहणारे आईने दिलेल्या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, त्यांची मुलगी  ही वरोरा येथे  इयत्ता १० वीमध्ये शिक्षण घेत आहे.

दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास मुलीने आईला आपण आज शाळेत न जाता वरोरा येथे फोटो काढण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर तिचे आई-वडील शेतमजुरीच्या कामासाठी बाहेर गेले.

सायंकाळी सुमारे ५ वाजता आई-वडील घरी परतल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत मोठा मुलगा  याच्याकडे विचारपूस केली असता, मुलगी दुपारी सुमारे १२ वाजता गावातील बसस्टॉपवर शाळेतील मुलींसोबत दिसल्याचे त्याने सांगितले.

कुटुंबीयांनी मुलीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद असल्याचे आढळून आले. गावात तसेच नातेवाईकांकडे शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही.

यानंतर मुलीच्या आईने वरोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अज्ञात इसमाने फूस लावून आपल्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी तक्रार नोंदवून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध सुरू केला आहे.

...................

Comments