वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

आष्टा येथे अवैध देशी दारूसह युवकावर गुन्हा; ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त.


आष्टा येथे अवैध देशी दारूसह युवकावर गुन्हा; ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

शेगाव, दि. 6 सप्टेंबर २०२६ : मौजा आष्टा, ता. भद्रावती येथे अवैधरित्या देशी दारू बाळगल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी एका युवकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ४ सप्टेंबर रोजी रात्री करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन शेगाव येथे कार्यरत असलेले सफौ/2244 दिलीप लक्ष्मणराव सुर (वय ५५) हे ड्युटीवर असताना मौजा आष्टा येथे काही महिला मंडळींनी दारू विक्री करणाऱ्या इसमाला पकडून ठेवल्याची माहिती फोनद्वारे मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने आष्टा येथील गुरुदेव प्रार्थना मंदिर परिसरात धाव घेतली. त्यावेळी तेथे महिला व पुरुषांचा जमाव दिसून आला. एका इसमाच्या हातात प्लास्टिकची चुंगळी आढळून आली.

पंचांसमक्ष संबंधित इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव वैभव प्रभाकर मगरे (वय ३० वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. आष्टा, ता. भद्रावती) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील प्लास्टिक चुंगळीची झडती घेतली असता त्यामध्ये प्रत्येकी ९० मिली क्षमतेच्या देशी दारू रॉकेट संत्रा कंपनीच्या १२ सिलबंद बाटल्या आढळून आल्या.

या दारूची एकूण किंमत ४८० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. सदर दारू बाळगण्यासाठी कोणताही पास अथवा परवाना नसल्याचे आरोपीने सांगितल्याने पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त दारूमधील एक बाटली रासायनिक विश्लेषणासाठी (सी.ए.) सीलबंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी आरोपी वैभव प्रभाकर मगरे याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.



Comments