लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मानोरा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चौघे ताब्यात, १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

मानोरा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चौघे ताब्यात, १.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

भद्रावती, दि. १० सप्टेंबर २०२६ : मानोरा गावातील माता मंदिरासमोरील खुल्या जागेत पैशांची हार-जीत लावून जुगार खेळणाऱ्या चार जणांवर भद्रावती पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे १० सप्टेंबर रोजी पोलिस पथकाने पंचांसह मानोरा येथील माता मंदिर परिसरात छापा टाकला. यावेळी काही जण पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांना पाहून काही जणांनी पळ काढला; मात्र चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये प्रशांत भाऊराव भोंगडे (वय ४४, रा. गौतम नगर, भद्रावती), रविंद्र काशीराम भुरे (वय ४५, रा. किल्ला वॉर्ड, भद्रावती), नितेश बंडू बेलेकर (वय ३५, रा. बरांज मोकासा, भद्रावती) आणि संजय शामराव मेश्राम (वय ५३, रा. मानोरा, भद्रावती) यांचा समावेश आहे.

कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, दोन दुचाकी, तीन मोबाईल फोन, डावावरील रक्कम आणि ५२ पत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ७५ हजार ४२० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध कलम १२(अ), महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये भद्रावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष नारायण केदार करीत आहेत.



Comments