लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

भद्रावतीत भाजप महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न :


भद्रावतीत भाजप  महिला आघाडीतर्फे रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न :

भद्रावती प्रतिनिधी.३/सप्टेंबर/२०२६

भारतीय जनता पार्टी भद्रावती तथा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, भद्रावती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रक्षाबंधन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ भाजप नेते व  पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली.

या सोहळ्यात बहिणींनी प्रेमाने राखी बांधून बहीण-भावाच्या अतूट नात्याचा, विश्वासाचा आणि स्नेहाचा सुंदर संदेश दिला. रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून प्रेम, आपुलकी, संरक्षण आणि परस्पर विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा उत्सव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


या प्रसंगी महिला भगिनींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने सोहळ्याला विशेष उत्साह प्राप्त झाला. सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि आपुलकीची भावना जपत हा सुंदर कार्यक्रम आनंदात पार पडला.

मायेचा धागा, प्रेमाचा विश्वास आणि नात्यांमधील आपुलकी सदैव अशीच कायम राहो, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे नेते माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री, माजी खासदार हंसराज अहिर, वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार करण देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..............




Comments