वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला वेशभूषा स्पर्धा व भव्य दहीहंडी उत्सव!


वरोरा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने ५ सप्टेंबरला वेशभूषा स्पर्धा व भव्य दहीहंडी उत्सव!

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वरोऱ्यात विविध उपक्रम; खासदार, आमदारांसह मान्यवरांची राहणार उपस्थिती!

वरोरा (विशेष प्रतिनिधी): चेतन लूतडे 


सकल हिंदू समाज, वरोरा यांच्या वतीने श्री कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे औचित्य साधून शनिवार, दिनांक ०५ सप्टेंबर २०२६ रोजी वरोरा शहरात भव्य 'वेशभूषा स्पर्धा' आणि 'दहीहंडी उत्सव २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. आमदार श्री. करणभाऊ देवतळे यांच्या विशेष सहकार्याने हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

प्रमुख उपस्थिती:

या सोहळ्याला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. करणभाऊ देवतळे, वरोरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सौ. अर्चनाताई ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदांतीताई देवतळे आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. आशिषभाऊ ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

भव्य वेशभूषा स्पर्धा:

शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी ०१:०० ते ०४:०० या वेळेत 'श्री. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन, वरोरा' येथे बालकांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

  • गट १ (वय १ ते ६ वर्षे): प्रथम बक्षीस - सायकल, द्वितीय बक्षीस - सायकल (Kids), तृतीय बक्षीस - स्टडी टेबल.
  • गट २ (वय ६ ते १२ वर्षे): प्रथम बक्षीस - सायकल, द्वितीय बक्षीस - सायकल (Kids), तृतीय बक्षीस - स्टडी टेबल.

​स्पर्धकांसाठी नाव नोंदणीची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२६ असून, स्पर्धकांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावे. अधिक माहिती व नोंदणीसाठी ७८८८००२७२५ किंवा ८४५९५८४८६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

भव्य दहीहंडी उत्सव २०२६:

त्याच दिवशी सायंकाळी ०६:०० ते १०:०० या वेळेत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वरोरा' येथे भव्य दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार आहे.

​या दोन्ही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना वरोरा शहर व परिसरातील नागरिकांनी, बालगोपालांनी तसेच दहीहंडी पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, वरोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Comments