लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात झोपला मारोती देवस्थानतर्फे भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन.

वरोऱ्यात झोपला मारोती देवस्थानतर्फे भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन.

वरोरा :  मारोती देवस्थान कमिटी, दत्त मंदिर वार्ड, वरोरा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बालगोपाळांसाठी भव्य तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उत्सव दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून झोपला मारोती देवस्थान, विवेकानंद शाळेमागे, वरोरा येथे उत्साहात पार पडणार आहे.

पोळा हा शेतकऱ्यांचा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पारंपरिक सण आहे. भारतीय संस्कृतीतील ही समृद्ध परंपरा लहान मुलांपर्यंत पोहोचावी व बालगोपाळांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल प्रेम व जिव्हाळा निर्माण व्हावा, या उद्देशाने दरवर्षी तान्हा पोळा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवामध्ये लहान बालगोपाळ आपापल्या आकर्षक सजविलेल्या लाकडी नंदीबैलांसह सहभागी होणार आहेत.

उत्सवात सहभागी होणाऱ्या बालगोपाळांसाठी विशेष आकर्षण म्हणून लकी ड्रॉच्या माध्यमातून १२ आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक नंदी घेऊन येणाऱ्या बालगोपाळाला टिफिन बॉक्स भेट म्हणून प्रदान करण्यात येणार आहे.

स्पर्धेसाठी सहभागी बालगोपाळांची नोंदणी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. ३१२ नोंदणी पूर्ण होताच कार्यक्रमाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

तरी वरोरा शहरातील सर्व बालगोपाळांनी व पालकांनी या पारंपरिक आणि सांस्कृतिक उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन बांधकाम सभापती, नगर परिषद वरोरा तथा शिवसेना चंद्रपूर जिल्हा संघटक मनीष मुरली जेठानी यांनी केले आहे.


Comments