वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

मजरा येथे महिलेच्या मारहाणीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

मजरा येथे महिलेच्या मारहाणीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

वरोरा, दि. १६ सप्टेंबर २०२६ : मजरा येथे महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

फिर्यादी कमला गजानन चांदेकर (वय ३६, रा. मजरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) यांच्या तक्रारीनुसार, त्या रेती गाळण्याच्या कामासाठी जात असताना सत्यपाल बळीराम चांदेकर याने त्यांना शिवीगाळ केली. याबाबत त्यांनी सत्यपालची बहीण चित्रकला मेश्राम व पत्नी गौरी सत्यपाल चांदेकर यांना सांगितले असता तिघांनी मिळून हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, फिर्यादीचे पती गजानन विठ्ठल चांदेकर हे पत्नीला सोडविण्यासाठी आले असता चित्रकला मेश्राम हिने त्यांच्या गालावर मारल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर फिर्यादीने वरोरा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली.

या प्रकरणी सत्यपाल बळीराम चांदेकर, गौरी सत्यपाल चांदेकर आणि चित्रकला मेश्राम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3(5), 352, 351(2), 115(2) व 296 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार मदन शंकरराव यराणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.१० वाजता वरोरा पोलीस ठाण्यात करण्यात आली. 



Comments