लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बसस्थानकात जुगारावर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, चौघे फरार.

बसस्थानकात जुगारावर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, चौघे फरार.

शेगाव, दि. 10 सप्टेंबर 2026 : 
मोवाडा गावातील बसस्थानक परिसरात पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्यांवर शेगाव पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, काही जण अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
दि. 9 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता ते दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत सफौ प्रशांत गायकवाड व पोशी प्रशांत गिरडकर हे रात्रपाळी कर्तव्यावर होते. गस्तीवर असताना मोवाडा बसस्थानकात काही इसम 52 पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह रात्री सुमारे 3.10 वाजता मोवाडा बसस्थानकावर छापा टाकला. यावेळी काही जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले, तर श्रीकांत पंढरी वाकडे, विलास पांडुरंग दडमल आणि समीर धनराज बाटबरवे, तिघेही रा. मोवाडा, हे जुगार खेळताना मिळून आले.
पोलिसांनी घटनास्थळावरील डावावरील रक्कम तसेच आरोपींच्या अंगझडतीत मिळालेली रोख रक्कम जप्त केली. कारवाईत एकूण ३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये आरोपींकडून अनुक्रमे २ हजार, ५०० व ६०० रुपये रोख तसेच डावावरील रोख रक्कम आणि ५२ पत्त्यांचा समावेश आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Comments