वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

एक्सोना माईन्सच्या ब्लास्टिंगने वरोरा शहर हादरले?; सरदार पटेल वॉर्डात घराचे छत कोसळले.

एका माईन्सच्या ब्लास्टिंगने वरोरा शहर हादरले?; सरदार पटेल वॉर्डात घराचे छत कोसळले.

वरोरा -चेतन लूतडे 

वरोरा : सोमवारी दुपारी वरोरा शहरात अचानक भूकंपासारखे तीव्र धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या तीव्र कंपनांमुळे शहरातील अनेक घरांना तडे जाणे तसेच घरांच्या बांधकामाचे नुकसान झाल्याची चर्चा असून, एका माईन्समध्ये सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे हे धक्के जाणवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वरोरा शहरातील सरदार पटेल वॉर्ड, प्रभाग क्रमांक २, छत्रपती शिवाजी चौक परिसरातील गोसावी नारायण दातारकर यांच्या घराचे सिमेंटचे पक्के छत सोमवारी दुपारी झालेल्या तीव्र कंपनांनंतर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.


माईन्समधील ब्लास्टिंगमुळे वरोरा शहरातील घरांना कंपनांचा फटका बसत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. या समस्येबाबत संबंधित प्रशासन व कंपनीकडे अनेक निवेदने देण्यात आली असून, वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे. शहरात झालेले कंपन किती रिऍक्टरचे होते हे सुद्धा अजून पर्यंत कळाले नाही. प्रशासन हदबल झाले असून अजून पर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत येथील नगरसेवक बंडू देऊळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. संबंधित प्रशासनाने घटनास्थळी जाऊन त्वरित पाहणी करून नुकसान भरपाई करून द्यावी असे मत व्यक्त केले आहे.


दरम्यान, माईन्स परिसरात मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग सुरू असल्याने त्याचा परिणाम शहरातील जुन्या तसेच पक्क्या घरांच्या बांधकामांवर होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. सोमवारी पुन्हा एकदा तीव्र कंपन जाणवल्यानंतर घराचे छत कोसळल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

ब्लास्टिंगमुळेच घरांचे नुकसान झाले आहे का, याची तातडीने तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

................

जाहिरात

आमदार करण देवतळे यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन. 

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या घरी श्री गणपतीचे आगमन. 

श्री गणेश चतुर्थी व गणेश उत्सव निमित्त  मंगलमय शुभेच्छा.


Comments