लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

घोडपेठ येथे बैलपोळा उत्साहात साजरा; उत्कृष्ट बैलजोडी मालकांचा बक्षिसांनी गौरव.


घोडपेठ येथे बैलपोळा उत्साहात साजरा; उत्कृष्ट बैलजोडी मालकांचा बक्षिसांनी गौरव.

१०/९/२०२६ -प्रतिनिधी

घोडपेठ : भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रघुवीर अहिर यांच्या वतीने मागील १० ते १२ वर्षांपासून घोडपेठ येथे बैलपोळा उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला.

यावेळी रघुवीर अहिर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून परिसरातील शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांचे असलेले महत्त्व अधोरेखित करत पारंपरिक पद्धतीने बैलपोळा उत्सव साजरा करण्यात आला.


उत्कृष्ट पद्धतीने बैलजोडी सजविणाऱ्या बैलजोडी मालकांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाला माजी खासदार हंसराजजी भैय्या अहिर, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, हरिभैया अहिर, रघुवीर अहिर, माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर, प्रकाश देवतळे, अनिल फुलझले, किशोर गोवारदिपे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैलपोळ्यानिमित्त शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Comments