लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

*वरोरा शहरात कल्पतरू गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे जल्लोषात आगमन*

*वरोरा शहरात कल्पतरू गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे जल्लोषात आगमन*

वरोरा : शहरातील कल्पतरू गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात आगमन करण्यात आले. गणरायाच्या आगमन सोहळ्यामुळे आंबेडकर चौक परिसरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी आंबेडकर चौक परिसरात मंडळाच्या वतीने भव्य दिव्य रोषणाई करण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. गणरायाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भक्तांनी उपस्थिती लावत बाप्पाचे दर्शन घेतले.

ढोल-ताशांचा निनाद, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती. भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गणरायाच्या आगमन सोहळ्याला मोठ्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.

आज मंगळवारी साडेतीन वाजताच्या दरम्यान पुन्हा कंपन झाले आहे

Comments