लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

खापरी-टाकळी परिसरात अवैध दारूविक्रीवर कारवाई; २४ पव्वे जप्त, दोन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या कारवाईपूर्वी पसार; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

खापरी-टाकळी परिसरात अवैध दारूविक्रीवर कारवाई; २४ पव्वे जप्त

दोन्ही संशयित आरोपी पोलिसांच्या कारवाईपूर्वी पसार; वरोरा पोलिसांत गुन्हा दाखल

वरोरा, दि. 13 सप्टेंबर २०२६ : डोंगरगाव रेल्वे परिसरातील महिलांनी अवैधरित्या विक्री होत असलेली देशी दारू पकडून पोलीस पाटील दर्शना कामटकर यांच्या घरी आणली. याबाबत माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रॉकेट संत्रा देशी दारूच्या ९० एमएलच्या एकूण २४ पव्व्या, किंमत ८८० रुपये जप्त केल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबर ला सदर दारू मोतीराम  कुळसंगे ( रा. खापरी, ता. वरोरा) आणि विठ्ठल म मेश्राम ( रा. टाकळी) यांची असल्याचे महिलांनी सांगितले. मोतीराम कुळसंगे यांच्या घराजवळून १२ नग तर विठ्ठल मेश्राम यांच्या शेतातून १२ नग दारूच्या पव्व्या आणल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात नमूद आहे.

दारू विक्री करताना दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागण्यापूर्वी पळून गेल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले. पंचासमक्ष जप्तीची कारवाई करून त्यातील एक पव्वा रासायनिक विश्लेषणासाठी नमुना म्हणून वेगळा काढून सीलबंद करण्यात आला.

या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गणेश काशिनाथ मोरे यांच्या फिर्यादीवरून वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.



Comments