वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

*भद्रावतीत ५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिन सोहळा’**स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांचे आयोजन*

*भद्रावतीत ५ सप्टेंबरला ‘शिक्षक दिन सोहळा’*

*स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांचे आयोजन*

भद्रावती : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘शिक्षक दिन सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता श्री मंगल कार्यालय, मेन रोड, भद्रावती येथे होणार आहे.

सेवानिवृत्त, कार्यरत शिक्षक-कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि बंधू-भगिनी यांच्या सन्मानार्थ आयोजित या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आमदार शिक्षक मतदारसंघाचे मा. श्री. सुधाकरजी अडबाले भूषविणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी गृहराज्यमंत्री मा. श्री. हंसराजजी अहीर यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला खासदार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या मा. श्रीमती प्रतिभा धानोरकर, आमदार वरोरा-भद्रावती मा. श्री. करणजी देवतळे, अध्यक्ष लोक शिक्षण संस्था वरोरा मा. प्रा. श्रीकांतजी पाटील, अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मा. श्री. रविंद्र शिंदे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती मा. श्री राजू डोंगे तसेच गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकुलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, संत गाडगे महाराज जन्मभूमी ते प्रयाण कार्यक्रम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयक मार्गदर्शक उपक्रम, बाबा आमटे आरोग्य अभियान, वामनराव बाकरे वाचनालय देणगी योजना, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, अनाथांसाठी मदत व शैक्षणिक पालक दत्तक योजना तसेच कै. म. ना. पावडे क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमांचा गौरव करण्यात येणार आहे.

“आपण आयुष्यात दिलेल्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचा गौरव व्हावा, हा हेतू आहे. तरी सर्व उपस्थितांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष प्रा. धनराजजी आस्वले, सचिव सौ. रुपाली रविंद्र शिंदे आणि कोषाध्यक्ष श्रीमती सुषमाताई शिंदे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सहभोजन कार्यक्रमानंतर लगेच ठेवण्यात आले आहे.
.................


Comments