वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

तात्पुरत्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन; एकता नगरातील इसमावर गुन्हा

तात्पुरत्या हद्दपार आदेशाचे उल्लंघन; एकता नगरातील इसमावर गुन्हा

वरोरा, दि. 11 सप्टेंबर 2026 : पोळा व तान्हा पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी वरोरा पोलीस हद्दीतून दोन दिवसांसाठी तात्पुरते हद्दपार करण्यात आलेल्या इसमाने आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगेश गुप्तराज रामटेके (वय 48, रा. एकता नगर, टेमुर्डा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत वरोरा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोळा व तान्हा पोळा सणाच्या काळात सार्वजनिक शांतता भंग होऊ नये तसेच त्याच्या दारू विक्रीच्या कृत्यांना आळा बसावा, यासाठी वरोरा पोलिसांनी इस्तेगाशा क्र. 382/2026 अन्वये कलम 163(2) भा.ना.सु.सं. अंतर्गत तात्पुरत्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांनी दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी आदेश काढून मंगेश रामटेके याला दि. 10 व 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तात्पुरते हद्दपार केले होते. सदर आदेशाची त्याला दि. 9 सप्टेंबर रोजी बजावणी करून वरोरा हद्दीतून बाहेर जाण्याचे लेखी निर्देश देण्यात आले होते.

मात्र, दि. 10 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास पोलिसांच्या पेट्रोलिंगदरम्यान मंगेश रामटेके हा टेमुर्डा येथील एकता नगर परिसरात फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून ओळख पटविली. घटनास्थळी पंचनामा करून त्याला तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेऊन वरोरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याने मंगेश रामटेके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम 223 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उमाकांत माधवराव गौरकार यांनी कायदेशीर अहवाल सादर केला.



Comments