लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

पुस्तकाअभावी शिक्षणात अडथळा नको; मनीष जेठाणी यांचा पुढाकारविवेकानंद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून पाठ्यपुस्तकांचे वितरण

पुस्तकाअभावी शिक्षणात अडथळा नको; मनीष जेठाणी यांचा पुढाकार

विवेकानंद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्वखर्चातून पाठ्यपुस्तकांचे वितरण

वरोरा, दि. ९ सप्टेंबर : वरोरा येथील विवेकानंद उच्च प्राथमिक शाळेतील काही विद्यार्थ्यांकडे आवश्यक पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर नगरपरिषदेचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती मनीष जेठाणी यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून पुस्तकांची व्यवस्था केली. विद्यार्थ्यांना या पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या बालपणीच्या संघर्षाची आठवण सांगताना मनीष जेठाणी म्हणाले की, पुस्तकाचे महत्त्व आणि त्यासाठी पालकांना करावा लागणारा संघर्ष मला स्वतःच्या अनुभवातून माहीत आहे. एका विद्यार्थ्यालाही पुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, हीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

“हे पुस्तक केवळ भेट नसून तुमच्या हातातील शस्त्र आहे. त्याचा योग्य उपयोग करून मोठे व्हा आणि भविष्यात गरजू विद्यार्थ्यांनाही तुम्ही मदतीचा हात द्या,” असे आवाहन जेठाणी यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी मशारकर, ज्ञानेश्वर माथनकर, अरुण ढोके, पुरुषोत्तम पिजदूरकर, रमेश पेचे, रामदास भोयर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन माहूरले यांनी केले, तर आभार नीता एकरे यांनी मानले.



Comments