लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

जळका येथे जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांची धाड; तिघांवर गुन्हा दाखल

 जळका येथे जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांची धाड; तिघांवर गुन्हा दाखल

वरोरा | दि. ९ सप्टेंबर २०२६ : जळका येथील हनुमान मंदिराजवळ खुल्या जागेत ५२ ताशपत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या तिघांवर वरोरा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व ताशपत्ते असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नंदकिशोर खनके व पोलीस अंमलदार रोशन तामसेटवार यांच्या पथकाने दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस दूरक्षेत्र माढेळी परिसरात दारूबंदी व जुगारविरोधी कारवाईच्या अनुषंगाने पेट्रोलिंग सुरू केली होती. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी जळका येथील हनुमान मंदिराजवळ छापा टाकला.

छाप्यादरम्यान ५२ ताशपत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना तीन जण आढळून आले. त्यांच्या ताब्यातील जुगाराच्या डावावरून ७०० रुपये रोख व ताशपत्ते जप्त करण्यात आले. त्यानंतर पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता आरोपी योगेश हरीभाऊ ईटनकर याच्याकडून १,२६० रुपये, रविंद्र बाळकृष्ण मेश्राम याच्याकडून १०० रुपये, तर हरीप्रकाश मोतीलाल बसावत याच्याकडून ४०० रुपये, अशी एकूण २,४६० रुपये रोख रक्कम मिळून आली.

या प्रकरणी योगेश हरीभाऊ ईटनकर (वय ३९), रविंद्र बाळकृष्ण मेश्राम (वय ४०) आणि हरीप्रकाश मोतीलाल बसावत (वय ४९), तिघेही रा. जळका, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.५० ते १०.३० वाजेपर्यंत घटनास्थळी जप्ती पंचनामा केला. या कारवाईमुळे जळका परिसरातील अवैध जुगार खेळणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

...........


Comments