लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

साखरा-वडगाव परिसरातील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात शेगाव येथील डॉक्टरला अटक .

साखरा-वडगाव परिसरातील विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणात शेगाव येथील डॉक्टरला अटक

गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचा आरोप; उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांची कारवाई

शेगाव (बु.) : साखरा-वडगाव परिसरातील विवाहित महिलेच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर एका डॉक्टरला अटक केली आहे. डॉ. विष्णू विश्वास असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर रविवारी पोलिसांनी ही कारवाई केली.

शेगाव (बु.) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साखरा-वडगाव परिसरातील मयुरी हरिदास सुपारे या विवाहित महिलेने दि. २ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तिने शेगाव (बु.) येथील एका डॉक्टरांच्या दवाखान्यात गर्भपात झाल्याचा उल्लेख केल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. या आरोपांच्या अनुषंगाने शेगाव पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला होता.

या प्रकरणात यापूर्वी महिलेच्या पतीलाही अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान महसूल विभाग, पोलिस विभाग, आरोग्य विभाग तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शेगाव (बु.) येथील डॉ. विष्णू विश्वास यांच्या दवाखान्यावर धाड टाकली होती.

या कारवाईदरम्यान विविध प्रकारची औषधे, इंजेक्शने, सलाईन, शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणे तसेच काही प्रतिबंधित स्वरूपाच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली होती. बऱ्याच वर्षापासून शेगाव येथे डॉक्टर असल्याची प्रॅक्टिस सुरू होती.

दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने संबंधित डॉक्टरांचा शोध सुरू असताना ते फरार झाले होते. त्यानंतर डॉ. विष्णू विश्वास यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने अखेर रविवारी पोलिसांनी त्यांना अटक केली.

डॉक्टरला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली असून पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.


Comments