लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चार पिढ्यांची परंपरा; लाकडे परिवारातर्फे उत्साहात जन्माष्टमी उत्सव साजरा.

चार पिढ्यांची परंपरा; लाकडे परिवारातर्फे उत्साहात जन्माष्टमी उत्सव साजरा

निसर्गरम्य वातावरणातील श्रीकृष्णाच्या बासरीची मनमोहक थीम ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू

वरोरा : शेषरत्न बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा समाजसेवक धिरज लाकडे यांच्या लाकडे परिवारातर्फे मागील चार पिढ्यांपासून सुरू असलेली जन्माष्टमी उत्सवाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने साजरी करण्यात आली.

लाकडे परिवारातर्फे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध आकर्षक व नावीन्यपूर्ण थीम साकारून भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. यावर्षीही अत्यंत मनमोहक आणि निसर्गरम्य वातावरणावर आधारित देखावा साकारण्यात आला होता.

यंदाच्या थीमनुसार भगवान श्रीकृष्ण निसर्गरम्य वातावरणात येऊन आपल्या मधुर बासरीच्या सुरांनी गोपी आणि गावकऱ्यांना मंत्रमुग्ध करीत असल्याचा सुंदर देखावा उभारण्यात आला होता. या आकर्षक देखाव्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

जन्माष्टमीनिमित्त आयोजित या धार्मिक उत्सवात परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. उपस्थित सर्व भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेत उत्सवाचा आनंद लुटला.

मागील चार पिढ्यांपासून अखंडपणे जपली जात असलेली ही धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाकडे परिवार आजही त्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे चालवत असून, हा जन्माष्टमी उत्सव परिसरातील भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.




Comments