लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना आधार; रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम भद्रावतीत शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात; ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात

शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना आधार; रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा सेवाभावी उपक्रम

भद्रावतीत शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात; ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात

भद्रावती : शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार आणि समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने स्वर्गीय श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त भद्रावती येथे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

श्री मंगल कार्यालय, भद्रावती येथे आयोजित या कार्यक्रमात ट्रस्टचे संस्थापक तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रवींद्र शिंदे यांच्या पुढाकारातून आणि ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज काका आस्वले यांच्या मार्गदर्शनाखाली सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री. सुधाकरजी अडबाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा माजी अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग श्री. हंसराज अहिर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची उपस्थिती होती.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनराज पाटील आस्वले काका, अपर पोलीस अधीक्षक ईश्वरजी कातकडे, डीवायएसपी सचिन केंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू डोंगे, भाऊरावजी खूटेमाटे काका, सुधाकरराव कडू काका, नगरसेविका वृषालीताई पांढरे, नगरसेविका कविताताई सावनकर, पवारताई यांच्यासह अनेक मान्यवर, सेवानिवृत्त शिक्षक, ज्येष्ठ नागरिक व ट्रस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि विदेही सद्गुरू संत जगन्नाथ महाराज यांना अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी ट्रस्टचे संस्थापक श्री. रवींद्र शिंदे यांनी ट्रस्टच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. शिक्षण, आरोग्य, क्रीडा, दिव्यांग कल्याण, कायदेविषयक मार्गदर्शन आणि जनजागृती अशा विविध क्षेत्रांत ट्रस्ट सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रस्टच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभ्यासिका योजना, श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सद्गुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेविषयक मार्गदर्शन उपक्रम, कैलासवासी म. ना. पावडे क्रीडा स्पर्धा, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना तसेच अनाथांची माई स्वर्गीय सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना राबविण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.



३५० हून अधिक विद्यार्थ्यांना आधार

स्वर्गीय सिंधुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजनेअंतर्गत ३५० हून अधिक विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक आधार देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉपसह विविध शैक्षणिक सुविधांसाठी मदत केली जाते.

विशेष म्हणजे, याच उपक्रमांतर्गत कार्तिक गजानन खंडाळकर या विद्यार्थ्याच्या इंजिनिअरिंग कॉलेज प्रवेशाचे संपूर्ण शुल्क ट्रस्टच्या वतीने भरण्यात आले. तसेच वंश गजानन टोंगे, दक्ष हरीष करमरकर, सानवी सुधीर नगराळे, तनवी सुनिल लोणारे, गुंजन प्रदीप पिंपळकर, नेहा राजू अंबोरे, देवांश अनिल नागपूरे, प्रणित अनिल फाले, दिव्यांश देवानंद येरेमे, वेदांत सुधीर नगराळे, होमेश्वरी सुरेंद्र घुगुल, शर्वी लक्ष्मीकांत मांडवकर, अवन्या मलखानसिंह सेंगर, सिद्धांत उत्तम करमनकर, सुहाणी किशोर घरत, रुद्र निलेश उपरे आणि गौरी संदीप वाघाडे या विद्यार्थ्यांनाही आर्थिक मदत करण्यात आली.

“शिक्षक कधीच माजी होत नाहीत”

आमदार सुधाकरजी अडबाले यांनी ट्रस्ट गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे नमूद केले. शिक्षकांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, “इतर क्षेत्रातील व्यक्तींना माजी म्हटले जाऊ शकते; मात्र शिक्षक कधीच माजी होत नाहीत. शिक्षक कायम शिक्षकच असतात.”

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ट्रस्टच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचे हे कार्य अनुकरणीय असल्याचे सांगितले.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी श्री. रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ओझे स्वतःच्या खांद्यावर घेत त्यांना शिक्षणासाठी मदत करणे हे अत्यंत प्रेरणादायी आणि अनुकरणीय कार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

अपर पोलीस अधीक्षक ईश्वरजी कातकडे यांनी समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींना घडविण्यामध्ये शिक्षकांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित शिक्षकांनीही चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. रवींद्र शिंदे यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सकारात्मकतेने लक्ष देऊन बँकेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

शिक्षकांचा सन्मान, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार आणि गरजूंसाठी मदतीचा हात—याच सेवाभावी विचारातून स्वर्गीय श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टची समाजसेवेची अविरत वाटचाल सुरू असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


Comments