लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा३ लाख ६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार दुचाकींसह रोख रक्कम ताब्यात

वरोऱ्यात बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जणांविरुद्ध गुन्हा

३ लाख ६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार दुचाकींसह रोख रक्कम ताब्यात

वरोरा : शहरातील गाणफाडे ले-आऊट परिसरात एका बंद घरामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी धाड टाकून पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत चार दुचाकी, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ६ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


ही कारवाई ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली. वरोरा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा गाणफाडे ले-आऊट येथील सुनिल चवले यांच्या बंद घरात काही व्यक्ती ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाड टाकली.

या कारवाईत पोलिसांना पाच जण जुगार खेळताना आढळून आले. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत—

  1. जयकुमार विजय वाघिरे (वय २९), रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा
  2. खुशांत पांडुरंग कायरकर (वय १८), रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा
  3. निलेश शंकरराव गोरे (वय ४५), रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा
  4. रविंद्र बंडू येटे (वय ३३), रा. कर्मवीर वॉर्ड, वरोरा
  5. रुपेश सुरेश आंबुरकर (वय ३७), रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा

पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींच्या अंगझडतीत मिळालेली ९ हजार २०० रुपये रोख, जुगाराच्या डावावरील २ हजार ३० रुपये रोख, ५२ तास पत्ते तसेच चार दुचाकी वाहने असा एकूण ३,०६,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तालेवार यांच्या तक्रारीवरून वरोरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश काशीनाथ मोरे करीत आहेत.

गुन्ह्याची नोंद

  • पोलीस ठाणे : वरोरा
  • एफआयआर क्रमांक : ०९२८/२०२६
  • गुन्हा दाखल दिनांक : ०३ सप्टेंबर २०२६
  • कलम : महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम ४ व ५
  • जप्त मुद्देमाल : ३,०६,७८० रुपये.
  • ............................................

Comments