लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रत्नमाला चौकातून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा

रत्नमाला चौकातून दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध वरोरा पोलिसांत गुन्हा

वरोरा, दि. ३ सप्टेंबर २०२६ : वरोरा शहरातील रत्नमाला चौक परिसरातून हँडल लॉक करून उभी केलेली हिरो कंपनीची फॅशन प्रो दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र सुरेशरावजी ठाकरे (वय ३८ वर्ष) हे सध्या वरोरा येथे किरायाने वास्तव्यास असून ते चिमणाझरी, बुटीबोरी येथील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. कामानिमित्त ते दररोज वरोरा ते चिमणाझरी असा प्रवास करीत असल्याने त्यांच्याकडे असलेली हिरो कंपनीची फॅशन प्रो, काळ्या रंगाची दुचाकी क्रमांक MH-40 AF-6875 वापरत होते.

दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजता ठाकरे यांनी आपली दुचाकी रत्नमाला चौकातील सहस हॉटेलजवळ हँडल लॉक करून उभी केली होती. त्यानंतर दिवसभर ड्युटी करून रात्री सुमारे ८ वाजता ते परत आले असता, दुचाकी जागेवर दिसून आली नाही.

आजूबाजूच्या परिसरात दुचाकीचा शोध घेतल्यानंतरही ती मिळून न आल्याने अज्ञात इसमाने सुमारे २५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरी करून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अखेर त्यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी वरोरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत चोरीच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस चोरीस गेलेल्या दुचाकीचा तसेच अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.

............................



Comments