लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश; शेकडो शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांचा प्रवेशप्रवीणदादा कदम यांच्या उपस्थितीत आशिष रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढली.

🔴 वरोऱ्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश; शेकडो शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश

जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीणदादा कदम यांच्या उपस्थितीत आशिष रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्याचा पक्षप्रवेश.

वरोरा, दि. २ सप्टेंबर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वरोरा येथे बुधवारी भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. जनाराम भवन, बोर्डा येथे आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांसह महिला शिवसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वरोरा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रवीण दादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसैनिक आशिष संजय रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमात आशिष रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेकडो शिवसैनिक व महिला शिवसैनिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश घेतला. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांनी पक्षात स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी वरोरा तालुक्यात शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. नव्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


कार्यक्रमाला भास्कर ताजने, चंद्रपूर जिल्हाप्रमुख  यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दिलीपजी कदम, अमित निब्रड उपजिल्हाप्रमुख, बंडुजी डाखरे  वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख, विपिनजी काकडे तालुकाप्रमुख वरोरा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना महिला आघाडीत अर्पिता वानखेडे, दीपा कांबळे, जोशना शेट्टी, विभा बेहेरे यांच्यासह अनेक महिला शिवसैनिकांनी  शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. 

कार्यक्रमाचे आयोजन आशिष संजय रणदिवे, शिवसैनिक, वरोरा यांनी केले होते. वरोरा-भद्रावती तालुक्यातील शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडी तसेच शिवसेनेच्या विविध आघाड्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

......,.............................

Comments