लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बरांज कोळसा खाण परिसरातून झाडांची चोरी; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखलट्रॅक्टर, ट्रॉली, लाकूड व झाडे तोडण्याचे साहित्य असा ४ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल

बरांज कोळसा खाण परिसरातून झाडांची चोरी; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ट्रॅक्टर, ट्रॉली, लाकूड व झाडे तोडण्याचे साहित्य असा ४ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल

भद्रावती, दि. १ सप्टेंबर : भद्रावती येथील बरांज कोळसा खाण परिसरात प्रदूषण नियंत्रणासाठी लावण्यात आलेली झाडे तोडून त्यांचे लाकूड चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सुरक्षा अधिकारी यांनी भद्रावती पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सुरक्षा अधिकारी बरांज कोळसा खाण परिसरात सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

फिर्यादीनुसार, KPCL कंपनीच्या कोळसा खाण परिसरात प्रदूषण वाढू नये यासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. सदर झाडे सध्या अंदाजे १५ ते २० फूट उंचीची झाली आहेत.

जाहिरात


दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास, कंपनीच्या जुन्या डम्पिंग एरियामध्ये काही व्यक्ती झाडे तोडून ट्रॅक्टरमध्ये भरून नेत असल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा अधिकारी व पेट्रोलिंग गार्ड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, बारूद मॅगझिनसमोरील रस्त्यावर एका ट्रॅक्टरमध्ये तोडलेले लाकूड भरून नेत असल्याचे आढळून आले.

यावेळी ट्रॅक्टर चालकासह पाच जण मिळून आले. त्यांच्याकडून झाडे तोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कटर मशीन आणि तीन कुऱ्हाडी आढळून आल्या. चौकशी केली असता कंपनीच्या परिसरात झाडे तोडून लाकूड ट्रॅक्टरमध्ये भरून नेत असल्याची बाब समोर आली.

या प्रकरणात स्वराज कंपनीचा ७४२-FE मॉडेलचा ट्रॅक्टर क्रमांक MH-34-BR-5537, ट्रॉली क्रमांक MH-34-A-2723, तोडलेल्या झाडांचे लाकूड, दोन कटर मशीन व तीन कुऱ्हाडी असा एकूण ४ लाख ३० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी राजेश शंकर कोतुलवार, प्रदीप प्रभाकर कोसरे, दिलीप विठ्ठल जीवतोडे, आनंदाराव आबाजी भोयर, योगेश आनंदाराव मेश्राम आणि धनंजय ताराचंद भोयर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रावती पोलिस ठाण्यात FIR क्रमांक ०८६१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील खालील कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कलम ३०३(२), ३२४(४), ३२९(३), १८९(२), १८९(३) आणि कलम १९०.

घटनेची नोंद दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.४५ वाजता करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहेत.

........



Comments