लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम; २ सप्टेंबरला रेल्वे वर्कशॉप रोडवर आयोजन

वरोऱ्यात शिवसेनेचा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम ; वरोऱ्यात शिवसेनेची ताकद वाढणार

आशिष संजय रणदिवे शिवसैनिक, यांचा शिवसेनेत प्रवेश.

वरोरा : चेतन लूतडे 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वरोरा येथे भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून, शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा पक्षप्रवेश कार्यक्रम जनाराम भवन, बोर्डा वरोरा येथे पार पडणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. प्रवीण दादा कदम, जिल्हा संपर्क प्रमुख, चंद्रपूर हे उपस्थित राहणार आहेत.


कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, श्री. संदीप भाऊ गिर्हे, चंद्रपूर जिल्हा प्रमुख (चंद्रपूर-बल्लारशाह, राजुरा विधानसभा) तसेच श्री. भास्कर भाऊ तानगे, चंद्रपूर जिल्हा प्रमुख (वरोरा-चिमूर-ब्रह्मपुरी विधानसभा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी विशेष उपस्थिती म्हणून श्री. दिलीपजी कदम, मुंबई, श्री. अमित भारतराव गिर्हे, उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर, श्री. बंडुजी डाखरे सर, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख, श्री. विपिन जी कापडे, तालुका प्रमुख वरोरा, श्री. नरेश भाऊ काले, तालुका प्रमुख भद्रावती, श्री. अतुल भाऊ नांदे, शहर प्रमुख वरोरा तसेच श्री. बंटी भाऊ हेमके, शहर प्रमुख भद्रावती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन आशिष संजय रणदिवे शिवसैनिक, वरोरा यांनी केले आहे. वरोरा-भद्रावती तालुक्यातील सर्व शिवसैनिक, युवासेना, महिला आघाडी तसेच शिवसेनेच्या सर्व आघाड्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

....................................

Comments