लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

माढेळी सबस्टेशन ते दिडोंरा बॅरेजदरम्यान 33 केव्ही वायरची चोरी; 2 लाखांचा मुद्देमाल लंपास

माढेळी सबस्टेशन ते दिडोंरा बॅरेजदरम्यान 33 केव्ही वायरची चोरी; 2 लाखांचा मुद्देमाल लंपास

वरोरा, दि. 11 सप्टेंबर 2026 : माढेळी एमएसईडीसीएल सबस्टेशन ते दिडोंरा बॅरेज (पंप हाउस) दरम्यान पोलवर टाकण्यात आलेला सुमारे 2 लाख रुपये किमतीचा 33 केव्ही अल्युमिनियम वायर अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पंप हाउससाठी विद्युत लाईन टाकण्याचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. या कामांतर्गत पोल उभारून AAA 100 SQ MM कंडक्टर टाकण्यात आला होता. शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळपर्यंत वायर व्यवस्थित असल्याचे आढळून आले होते. मात्र, रविवार 6 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पाहणी केली असता सोईट चौक ते नाला या परिसरातील 11 पोलवरील वायर कापून नेल्याचे निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या वायरची लांबी सुमारे 2 हजार मीटर असून त्याची अंदाजे किंमत 2 लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर कामाचे कंत्राट अधिरा इंटरप्रायजेस, नागपूर यांना देण्यात आले असून श्री. राजू नायर आणि महेश पटेल यांच्या टीमकडून काम सुरू आहे.

याप्रकरणी पदमा राजू नायर यांनी वरोरा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. चोरीस गेलेला वायर व आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

.............



Comments