वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

व्यापारी मंडळ व 24 तास ग्रुपच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन

व्यापारी मंडळ व 24 तास ग्रुपच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन
 वरोरा दिनांक 16 सप्टेंबर 
        दरवर्षीप्रमाणे वरोरा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील व्यापारी मंडळ आणि 24 तास सेवा ग्रुपच्या वतीने बालगोपालांसाठी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
      याप्रसंगी उद्घाटक म्हणून पार्थ धानोरकर यांची उपस्थिती होती. मंचावर नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, उपाध्यक्ष योगिता नेरकर, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, शिवसेनेचे मुकेश जीवतोडे, माजी नगराध्यक्ष आहतेश्याम अली, रोटरीचे अध्यक्ष अभिजीत मणियार, माजी नगरसेवक छोटू शेख, रवी कमल कॉन्टॅक्ट से संचालक संदेश चोरडिया, कांचणी ऍग्रो चे बालाजी धोबे, डॉ. काजल धोटे, 24 तास सेवा ग्रुपचे अध्यक्ष लखन केशवानी, इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष स्नेहल पत्तीवार आदीची उपस्थिती होती.
       याप्रसंगी बालगोपालांनी आपल्या नंदीबैलांची अत्यंत सुबक अशी सजावट केली होती. सहभागी बालगोपालांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथम पुरस्कार आद्या शेंडे, द्वितीय रुद्राक्ष क्षीरसागर,  तर तृतीय पुरस्कार प्रशिक चौरे, निवांशि केशवानी आणि सोहम ठाकरे यांना देण्यात आले. कार्यक्रम  संचालन आरती रोड़े 
    कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी दत्तश्री ठाकरे, पदम झोडापे, शुभम पर्वत, लेखू केशवानी, पाऊलकर, तेजस चौधरी, सुरज मेश्राम, घोडमारे, कुंमरे, शशी ठाकरे, शरद यादव, गायत्री पेचे, अर्पिता गनवाणी तसेच इतर सदस्यांनी कठोर परिश्रम घेतले.


.

Comments