लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

रक्षण करणाऱ्या हातांना सन्मानाची राखी; इनर व्हील क्लब वरोऱ्यातर्फे पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन उत्साहात

रक्षण करणाऱ्या हातांना सन्मानाची राखी; इनर व्हील क्लब वरोऱ्यातर्फे पोलिस बांधवांसोबत रक्षाबंधन उत्साहात

पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरण संवर्धनाचाही दिला संदेश

वरोरा : चेतन लूतडे,३०/८/२०२६

समाजात कायदा व सुव्यवस्था राखून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी इनर व्हील क्लब ऑफ वरोरा, डिस्ट्रिक्ट ३०३ आणि रोट्रॅक्ट क्लब वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी पोलिस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम केला. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्याबरोबरच समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता कायम राखण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत असतात. त्यांच्या या निस्वार्थ आणि समर्पित सेवेला सन्मान देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे इनर व्हील क्लब आणि रोट्रॅक्ट क्लबच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या हरित उद्यानातील एका झाडाला मोठी राखी बांधून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देण्यात आला. निसर्ग आणि वृक्ष हे देखील आपल्या जीवनाचे रक्षण करणारे घटक असून त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नसून, संरक्षण, विश्वास, प्रेम आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. “राखीचे नाते केवळ भावंडांपुरते मर्यादित नसून समाजाच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीशी जोडलेले आहे,” हा भावनिक संदेश यावेळी क्लबच्या सदस्यांनी दिला.

पोलिस बांधवांनीही या अनोख्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला. सामाजिक संस्थांकडून मिळणारा असा स्नेह आणि सन्मान कर्तव्य बजावताना निश्चितच प्रेरणा देणारा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमाला रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष विक्की आगलावे व उपाध्यक्ष, तसेच इनर व्हील क्लब वरोराच्या अध्यक्षा स्नेहल पत्तीवार, उपाध्यक्षा प्रतिभा मणियार, सचिव प्राजक्ता कोहळे, प्रिया टोंगे, दर्शना मोदी, सीमा लाहोटी, नीलिमा गुंडावार, सारिका बावणे, वैशाली चहारे, किरण जाकोटिया, कविता बाहेती, दिपाली टिपले यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस बांधवांप्रती आदर, सामाजिक कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश एकाच उपक्रमातून देणारा हा आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

“रक्षण करणाऱ्या हातांना प्रेमाची आणि सन्मानाची राखी” या भावनेतून साजरा करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments