लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

कासिफ खान यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार ग्रुपचा सामाजिक उपक्रम.

कासिफ खान यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार ग्रुपचा सामाजिक उपक्रम

वरोरा | दि. २० ऑगस्ट २०२६

वरोरा : सरकार ग्रुपचे अध्यक्ष कासिफ खान यांच्या वाढदिवसानिमित्त सरकार ग्रुप, वरोरा यांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली तसेच त्यांना फळांचे वाटप करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन सरकार ग्रुपचे सदस्य मुकेश चांदेकर यांच्या तर्फे वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे करण्यात आला. गरजू व उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबत वाढदिवसाचा आनंद वाटून घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सरकार ग्रुपच्या या उपक्रमाचे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांनी स्वागत केले. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल ग्रुपच्या सदस्यांचे कौतुक करण्यात आले.
सरकार ग्रुपचे अध्यक्ष काशीफ खान यांच्या वाढदिवसानिमित्त इष्टमित्र मंडळासह  चंद्रपूर- वणी -आर्णी विधानसभा क्षेत्राचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.
...........

Comments