लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोरा पोलिसांची कारवाई; विनारॉयल्टी रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

वरोरा पोलिसांची कारवाई; विनारॉयल्टी रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

वरोरा, दि. २८ ऑगस्ट २०२६ : वरोरा पोलिसांनी विनारॉयल्टी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण ५ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी पहाटे तुळाणा रोड परिसरात करण्यात आली.

वरोरा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुखराज रामचरण यादव हे पोलीस पथकासह २६ ऑगस्टच्या रात्रीपासून गस्तीवर होते. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेदोनच्या सुमारास तुळाणा गावाकडून वरोरा शहराकडे विनारॉयल्टी रेती भरलेला ट्रॅक्टर येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पंचांसह सापळा रचून शिवाजी वॉर्ड, पाणी टाकीजवळ ट्रॅक्टर अडविला.

तपासणीदरम्यान सिल्व्हर रंगाचा आयशर ४८५ ट्रॅक्टर क्रमांक एमएच ४० सी १९३३, त्याला जोडलेली लाल रंगाची विनानंबर ट्रॉली आणि त्यामध्ये अंदाजे एक ब्रास रेती आढळून आली. ट्रॅक्टरची किंमत सुमारे ४ लाख ५० हजार रुपये, ट्रॉलीची १ लाख रुपये आणि रेतीची किंमत ७ हजार रुपये असल्याचे FIR मध्ये नमूद आहे.

चालक राहुल सुरेश ठेंगणे, रा. तुळाणा, ता. वरोरा, याच्याकडे रेती वाहतुकीसंदर्भात रॉयल्टी, परवाना अथवा पावतीबाबत चौकशी केली असता, सदर रेती विनारॉयल्टी मौजा करंजी येथील नदीघाटातून आणल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. संबंधित ट्रॅक्टर हा स्वप्नील दाते यांच्या मालकीचा असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८ तसेच मोटार वाहन कायदा कलम २०२ व १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अमोल मारोती नवघरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 



Comments