लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बिन काट्याचा गुलाब फलकाचे अंध विद्यालयात अनावरण* *आता अंध मुलांनाही अनुभवता येणार गुलाबाचा स्पर्श*

*बिन काट्याचा गुलाब फलकाचे अंध विद्यालयात अनावरण*
 *आता अंध मुलांनाही अनुभवता येणार गुलाबाचा स्पर्श*
वरोडा : शाम ठेंगडी 
       आनंदवनातील अंध विद्यालयातील परिसरात "बिनकाट्याचा गुलाब" फलकाचे अनावरण मुंबई येथील नरेंद्र मेस्त्री व शालन  मेस्त्री  यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू ,दिलीप हेर्लेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
          श्रद्धेय बाबा आमटे यांचे आनंदवनातील प्रत्येक माणसावर अपार प्रेम होते, तर महाराष्ट्राचे लाडके लेखक पु. ल. देशपांडे यांचे माणसाच्या सुखदुःखाशी अतूट नाते होते. *"प्रकाशांची शाळा"* म्हणून नावलौकिक असलेल्या आनंदवनातील अंध विद्यालयातील काही अंध विद्यार्थी काटेरी गुलाबाच्या सुगंधित बागेत फिरली व त्या गुलाबाच्या फुलांचा सुगंध दरवळत असल्याने पाकळ्यांच्या कोमल स्पर्शातून आणि सुगंधाच्या आस्वादातून अंध मुलांना अवीट गोडीचा आनंद मिळवण्यासाठी झाडांना स्पर्श करताच अंध मुलांच्या हाताला काटा बोचला आणि अंध मुलांच्या कोवळ्या बोटातून रक्त व्हायला लागले. ही गोष्ट बाबा आमटे यांना कळली आणि त्या छोट्याशा वेदनेमुळे बाबांच्या अंतःकरणाला मोठी जखम झाली. ही बाब पु. ल. देशपांडे यांना कळली.तेव्हा त्यांनी ती केवळ ऐकलीच नाही, तर ती त्यांनी आपल्या मनात अनुभवली आणि त्यांनी बिन काट्याच्या गुलाबाचा शोध घेतला.
                 कलकत्त्याच्या बॉटनिकल गार्डन मध्ये त्यांना अखेर तो गुलाब सापडला आणि आनंदवनात एका गुलाबाच्या रूपाने दोन  प्रेमळ मनांची माणुसकी फुलली. श्रद्धेय बाबांचे  सेवाव्रत आणि पुलंचे जीवन प्रेम या दोन हृदयाच्या मिलनातून फुललेला हा गुलाब आजही प्रेमाची गोष्ट सांगतो. काटे नसलेला हा गुलाब केवळ फुल नव्हते तर तो एक बाबा आणि पूल यांच्या माणुसकीच्या प्रेमाचा सुगंध होता.तो बिन काट्याचा गुलाब सर्व अंध मुलांनीही अनुभवता यावा तसेच इतरांनाही या बिनकाट्याच्या गुलाबाची माहिती व्हावी म्हणून या बिनकाट्याच्या गुलाब फलकाचे अनावरण मुंबईच्या दिवंगत श्रीमती नुमेधा कामत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आनंदवनातील अंध विद्यालयाच्या परिसरात नरेंद्र मेस्त्री व शालन मेस्त्री यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच यावेळी या परिसरात पारिजातक या वृक्षाचे रोपणही करण्यात आले. 
यावेळी जितेंद्र बर्वे ,जगदीश पुराणिक, मधुरा र्हेलेकर, जगदीश पुराणिक, आनंदवनचे राजेश ताजने, अंधविद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा उईके, कलाशिक्षक परमानंद तिराणिक, तनुजा सव्वाशेरे वसतिगृह अधीक्षिका तृप्ती लोहकरे, विशेष शिक्षक विलास काबनपुरे ,संगीत शिक्षक राकेश आत्राम सेवकराम बांगडकर, अविनाश गायधने, आशिष भजनकर, जितेंद्र चुधरी हे उपस्थित होते.


Comments