लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; १४५ बाटल्या जप्त.

वरोऱ्यात अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई; १४५ बाटल्या जप्त

वरोरा | दि. २१ ऑगस्ट २०२६

कलम : महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई)

वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी कारवाई केली. या कारवाईत एका व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून १४५ नग देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोनटक्के, पोलीस हवालदार क्र. २५७१ संदीप मुळे, पोलीस अंमलदार क्र. ०१ विशाल राजुरकर व पोलीस पथक गस्त घालत असताना कॉलरी वॉर्ड परिसरातील एका घरात देशी दारूचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी तपासणी करण्यात आली. यावेळी घरासमोर एक व्यक्ती अवैधरित्या देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याने आपले नाव दारासिंह संगतसिंह दुधानी (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा) असे सांगितले.
तपासणीदरम्यान त्याच्याकडून ९० मि.ली. क्षमतेच्या १४५ प्लास्टिकच्या बाटल्या, ‘संत्रा’ लेबल असलेली रॉकेट देशी दारू, असा मुद्देमाल आढळून आला. या दारूची एकूण किंमत अंदाजे ५ हजार ८०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी मुद्देमालापैकी एक बाटली स्वतंत्रपणे काढून त्यावर पोलीस व पंचांच्या स्वाक्षरीचे कागदी लेबल लावून मोहरबंद केली. उर्वरित मुद्देमाल पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळाचा पंचनामा दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरोरा पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.

Comments