लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; एकास अटक, मुद्देमाल जप्त

वरोऱ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; एकास अटक, मुद्देमाल जप्त
वरोरा | दि. २८ जुलै २०२६

वरोरा पोलिसांनी शहरातील गांधी चौक येथील अनाज बाजार परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकून एका आरोपीला अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, कॅल्क्युलेटर, पेन व जुगारासाठी वापरण्यात येणाऱ्या आकड्यांच्या चिठ्ठ्या असा एकूण ₹१,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. 

या प्रकरणी नामदेव तुकाराम पराते  याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी चौक अनाज बाजार परिसरातील प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानात बोगस आकड्यांवर पैसे स्वीकारून जुगार खेळविला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पळून गेले. मात्र आरोपी नामदेव पराते याच्याकडून दोन आकड्यांच्या चिठ्ठ्या, ₹८१० रोख रक्कम, एक पेन व एक जुना कॅल्क्युलेटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी फिर्याद पोलीस कर्मचारी रुपेश गोविंदराव निरसकर यांनी दिली असून वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०८४७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. 


Comments