लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

बालाजी मंदिरातील दानपेटी फोडून अडीच हजारांची रोकड लंपास

बालाजी मंदिरातील दानपेटी फोडून अडीच हजारांची रोकड लंपास

वरोरा | दि. ९ ऑगस्ट २०२६

वरोरा शहरातील बालाजी मंदिरात अज्ञात व्यक्तीने दानपेटीवरील कापडाला चीर मारून त्यातील अंदाजे २ हजार ते २ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी विनोद दिवाकरराव नौकरकर (वय ४७, रा. नागरी, ता. वरोरा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील दिवाकरराव अभिमानजी नौकरकर हे बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. प्रकृती ठीक नसल्याने ते सध्या घरी राहत असून, मंदिराचे कामकाज विनोद नौकरकर पाहतात. 

दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ३.४५ वाजताच्या सुमारास विनोद नौकरकर हे बालाजी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदिरातील देवासमोर ठेवलेल्या दानपेटीवरील कापडाला चीर मारल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी सुनील विठ्ठलराव घोलकर यांना बोलावून सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एका अज्ञात इसमाने दानपेटीवरील कापड कापून त्यातील पैसे काढल्याचे दिसून आले. 

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 305 व 331(3) अन्वये वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एफआयआर दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.५१ वाजता दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक गणेश काशीनाथ मोरे, वरोरा पोलीस ठाणे. तपास करीत आहे.

Comments